“या” जिल्ह्यात आणखी ३८ कोटींचा खरीप पीक विमा २०२१ मंजूर

crop insurance

Kharip Pik Vima 2021 Manjur | Pik Vima 2021

शेतकरी मित्रांनोप्रतिकूल परिस्थितीत शेती पिकांना विम्याचे संरक्षण मिळावेया हेतूने पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असते. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रीमियम भरावा लागतो. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा क्लेम केल्यानंतर विमा नुकसान भरपाई मिळत असते. 

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ च्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे. कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम मिळाली, किती बाधित क्षेत्र आहे याची सर्व माहिती यादी मध्ये दाखवण्यात आलेली आहे. Nuksan Bharpai Yadi २०२१ Maharashtra

परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ (Kharip Pik Vima 2021) मधील खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आणखीन ३८ कोटी ५१ लाख ७ हजार रुपये विमाभरपाई मंजूर (Pik Vima Manjur) करण्यात आली आहे.

त्यामुळे एकूण लाभार्थी शेतक-यांची संख्या ३ लाख ८२ हजार ९८५ पर्यंत, तर एकूण विमा परताव्याची रक्कम ३१० कोटी ५१ लाख ७ हजार रुपये झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी एकूण ४ लाख १० हजार ४४९ पूर्वसूचना विविध माध्यमांतून रिलायन्स विमा कंपनीकडे सादर केल्या होत्या. त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. एकूण २७ हजार ४६४ पूर्वसूचना विमाभरपाईसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यात ८८५ पूर्वसूचना पीकविमा प्रस्ताव सादर न केलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. २५ हजार ५८७ पूर्वसूचना या दोन वेळा सादर केलेल्या आहेत. पीक कापणी सुरू झालेल्या ६६६ आणि इतर ३२६ पूर्वसूचनांचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात ३ लाख ५१ हजार १६० शेतकऱ्यांना २७२ कोटींचा विमा परतावा मंजूर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *