दीड महिन्यानंतर सोयाबीन दरात वाढ; पाहा आजचे बाजार भाव

today soyabin rate

गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या जवळपास स्थिरावले होते. त्यामुळे संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनची आता कवडीमोल दराने विक्री होणार की काय अशीच अवस्था झाली होती. यामुळे अनेकांना मिळेल त्या दरात सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला मात्र, ज्या शेतकऱ्यांनी संयम पाळला आता त्यांना त्याचे फळ मिळणार असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा:-मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण रस्ते योजने अंतर्गत रस्ते मंजूर

गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या जवळपास स्थिरावले होते. त्यामुळे संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनची आता कवडीमोल दराने विक्री होणार की काय अशीच अवस्था झाली होती. यामुळे अनेकांना मिळेल त्या दरात (Soybean Sale) सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला मात्र, ज्या (Farmer) शेतकऱ्यांनी संयम पाळला आता त्यांना त्याचे फळ मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण 6 हजार रुपयांपर्यंत आलेले सोयाबीन आता 6 हजार 300 वर येऊन ठेपले आहे. (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी सोयाबीनला पोटलीतला दर हा 6 हजार 300 असा होता. गेल्या दीड महिन्यातील हा उच्चांकी दर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारात दिसणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी दर वाढले असले तरी आवक मात्र 18 हजार पोत्यांची झाली होती.

पुन्हा आशादायी चित्र

हंगामात अनेक वेळा सोयाबीनच्या दरात चढ-उतार झालेला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिकाही यासाठी जबाबदार ठरलेली आहे. सोयाबीनला चांगला दर असतानाच विक्री अन्यथा साठवणूक यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन 4 हजार 500 रुपये क्विंटल होते. मात्र, दिवाळीनंतर यामध्ये वाढ होऊन 6 हजार 500 पर्यंत दर गेले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून 6 हजावरच सोयाबीन हे स्थिरावले होते. त्यामुळे आता दरात वाढ होते की नाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. अखेर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीन हे 6 हजार 300 वर गेले असून दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

👉पहा महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव👈
 👇👇👇�

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *