न्यायालय मोजणी करता काय करावे लागेल

न्यायालय मोजणी land survey करता आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयात आपली जी काही तक्रार आहे प्रथमता आपल्याला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. आणि एकदा का आपण दिवाणी दावा दाखल केला की ते दिवाणी दाव्याच्या कामकाजाचे आणि सुनावणीच्या दरम्यान आपण दावा मिळकतीची मोजणी land survey होण्याकरता कोर्ट कमिशनर ची मागणी करू शकतो. जर आपला कोर्ट कमिशन चा अर्ज मंजूर झाला तर बहुतांशी वेळेला कोर्टाकडून भूमिअभिलेख विभाग जो आहे त्यांना या मोजणीचे land survey काम देण्यात येते आणि त्याची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात येते.

हे हि वाचा:घरबसल्या 50 हजार ते 1 लाखापर्यंत लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी

खाजगी मोजणीला land survey आपल्याला ज्या प्रकारे आडकाठी इतर लोकांकडून होऊ शकते तसे आडकाठी या न्यायालयामार्फत होणाऱ्या मोजणीला land survey होऊ शकत नाही. याची शक्यता फारच कमी असते कारण जेव्हा एखादे काम न्यायालयाच्या आदेशानुसार होत असते तेव्हा आवश्यकता आपण पोलीस प्रोटेक्षण सुद्धा माघू शकतो.

न्यायालया मार्फत होणाऱ्या land survey कामाला आडकाठी करणे किंवा त्याला अडथळा करणे याला न्यायालयाचा अवमान असे म्हणतात त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी होण्याची शक्यता नसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *