Pm kisan योजनेची E-KYC करण्यासाठी 31 मार्च ही मुदत

Pm kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना केवायसी करण्यासाठी 31 मार्च 2022 अंतिम मुदत देण्यात आली आहे. 31 मार्च पर्यंत जे शेतकरी ही केवायसी करतील तेच पुढील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत.

👉E -KYC करण्यासाठी 👈
👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी Pm kisan योजना ही 2018 पासून सुरू आहे परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस लोकांनी नोंदणी केल्यामुळे e_kyc बंधन कारक केलेली आहे. पी एम किसान Pm kisan या अधिकृत पोर्टल वरून तुम्हालाही केवायसी करणे 31 मार्चपर्यंत बंधनकारक आहे. जे लाभार्थी 31 मार्च पर्यंत केवायसी करतील त्यांनाच अकरावा हप्ता जमा होणार आहे.

पती-पत्नी लाभ घेत असल्यास होणारा आपात्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी Pm kisan योजनेअंतर्गत कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येत आहे असे योजनेत नमूद करण्यात आलेले आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी पती-पत्नी आणि त्यांच्या मुलाच्या नावे देखील सदर चा हप्ता जमा होत आहे त्यामुळे पती-पत्नी आणि कुटुंबातील इतर लाभार्थ्यांचे नावे देखील यातून वगळले जाणार आहेत.pm kisan योजनेअंतर्गत कुटुंब Pm kisan म्हणजे पती पत्नी आणि त्यांचा अविवाहित मुले यापैकी फक्त एका जणाला लाभ मिळणार आहे.

हे हि वाचा:-आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर

पती पत्नी आणि कुटुंबातील इतर जणाला जर लाभ  मिळत होता. तर आता इथून पुढे तो देखील बंद केला जाणार आहे.

E-KYC कशी करावी?

पी एम किसान Pm kisan योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल-जुलै 2022 या कालावधीत लाभ प्राप्त होण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे.  सदर ई-केवायसी दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

केवायसी करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन pm kisan योजनेचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्या ठिकाणी फार्मर्स कॉर्नर म्हणून एक ऑप्शन दिसेल तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून आधार ला लिंक असलेल्या मोबाईल वर आलेला ओटीपी सबमिट  करून तुमची केवायसी पूर्ण करू शकता.

जर तुमचा मोबाईल नंबर वर  केवायसी Pm kisan पूर्ण झाली नाही तर तुम्ही नजीकच्या सीएससी सेंटर वर जाऊन त्या ठिकाणी  अंगुठा लावून तुमची केवायसी पूर्ण करून घेऊ शकतात.

👉E -KYC करण्यासाठी 👈
👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top