land record:सुमारे साडेसात लाख सातबारे आता बंद होऊन तेथील मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार आहे. प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे.
सातबारा उतारे होणार बंद
सातबारा ऐवजी मिळणार हे कार्ड
जमीन मालकांची फसवणूक टळणार
ही प्रक्रिया सुसंगत होण्यासाठी प्रॉपर्टी कार्डची ‘ईपीसीआयएस’ प्रणाली आणि सातबाऱ्याची ‘ई-फेरफार’ प्रणाली ‘कलम १२२’नुसार, एकमेकांमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. जेव्हा नागरी भागातील बिनशेती भागाचे प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाईल, त्या वेळी तलाठ्यामार्फत तहसीलदारांना सातबारा उपलब्ध केला जाईल. सध्या समावेशनाच्या (इंटिग्रेशन) प्रणालीचे काम सुरू आहे. त्यामुळे सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दुहेरी अभिलेख उपलब्ध होतील, अशी नवी संगणक प्रणाली आणण्यात येणार आहे. परिणामी, जमिनींच्या खरेदी-विक्री प्रकरणांत गैरव्यवहार आणि जमीन मालकांची फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. सध्या सातबारा बंद केल्यानंतर मात्र, ‘प्रॉपर्टी कार्ड’ सुरू झाले नसल्याच्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.