सातबारा उतारे होणार बंद,सातबारा ऐवजी मिळणार हे कार्ड

नवीन प्रणाली दोन महिन्यांत

PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर

राज्यातील साडेचार हजार गावांतील सुमारे साडेसात लाख सातबारांचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रुपांतर होणार आहे. त्यापैकी सध्या पावणेसात लाख सातबारे बंद झाले असून, उर्वरित सुमारे ६३ हजार सातबारा बंद करण्याचे काम सुरू आहे. ‘महाभूमी’ पोर्टलवर सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशा दोन्ही अभिलेख असणाऱ्या जमिनी मॅप करून दाखविण्याची सुविधा उपलब्ध आहे. सातबारा सर्व्हे क्रमांक टाकल्यावर मिळकत पत्रिका दिसेल आणि मिळकत पत्रिका क्रमांक टाकल्यास सातबारा दिसेल. त्यामुळे जमीनमालकांची फसवणूक टाळता येईल.- सरिता नरके, संचालक, माहिती तंत्रज्ञान विभाग