Headlines

AICTE Laptop Scheme:सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा

AICTE Laptop Scheme

AICTE Laptop Scheme : भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (free laptop for students) सुरू केली आहे. तर यासाठी कोण अर्ज करू शकतो याची माहिती जाणून घेऊया…

सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप

येथे करा अर्ज

आधुनिक जगात तंत्रज्ञानाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणात देखील आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. मुलांनी तांत्रिक शिक्षण आत्मसात करावं, यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (AICTE Laptop Scheme) एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना सुरू केली आहे. याद्वारे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत. जर तुम्हाला या लॅपटॉपसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत साइटवर जाऊन अर्ज करू शकता. एआयसीटीईने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता गरिब विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकता येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा उद्देश या योजने मागील आहे जेणेकरून त्यांच्या अभ्यासात कोणतीही अडचण येऊ नये आणि विद्यार्थी डिजिटल पद्धतीने अभ्यास करू शकतील.

अर्ज करण्याच्या अटी काय?

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) आपल्या सर्व मान्यताप्राप्त महाविद्यालयांना पत्र लिहून ही योजना सुरू करण्यास सांगितलं आहे. फक्त भारतातील नागरिकांनाच याचा फायदा मिळणार आहे. तर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येईल.

कोणती कागदपत्रं गरजेचे?

आधार कार्ड, ओळखपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शैक्षणिक पात्रता कागदपत्र, अपंगत्वाचा दाखला, पासपोर्ट आकार फोटो आणि मोबाईल क्रमांक गरजेचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *