Register heirs:वारस नोंद करायचीयं का? तलाठ्याशिवाय करा ‘असा’ घरबसल्या अर्ज; १८ दिवसांत होईल नोंद

Register heirs:शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास त्यांची सातबारावर नोंद होईल Register heirs

वारस नोंद करायचीयं का?

वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली विकसित केली आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, कमी करणे, नावाची दुरुस्ती, वारस नोंदी करणे, ई-करार करणे अशा सेवांसाठी अर्ज करता येतो. अर्जावरील कार्यवाही कुठपर्यंत आली, हे देखील तपासता येते. दरम्यान, तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर १७ व्या दिवशी तो मंडलाधिकारी यांच्याकडे जातो. १८ व्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होतो. त्यासंबंधीचा अधिकार मंडलाधिकाऱ्यांना आहे.Register heirs

शपथपत्र अन्‌ स्वयंघोषणापत्र जरुरीचे

एका कागदावर शपथपत्र लिहून ते अपलोड करावे. त्यात मृत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे, पत्ते नमूद करावेत. सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर ‘फाईल अपलोड’ झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर एक स्वयंघोषणपत्र दिसेल. या पत्राखाली ‘सहमत’ (Agree) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर वारस नोंदीचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल. तेथे त्या अर्जाची छाननी होऊन तो मंजुरीसाठी मंडलाधिकाऱ्यांकडे जातो. १८व्या दिवशी सात-बारावर वारसांची नावे लागतील.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली विकसित केली आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, कमी करणे, नावाची दुरुस्ती, वारस नोंदी करणे, ई-करार करणे अशा सेवांसाठी अर्ज करता येतो. अर्जावरील कार्यवाही कुठपर्यंत आली, हे देखील तपासता येते. दरम्यान, तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर १७ व्या दिवशी तो मंडलाधिकारी यांच्याकडे जातो. १८ व्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होतो. त्यासंबंधीचा अधिकार मंडलाधिकाऱ्यांना आहे. Register heirs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *