वारस नोंद करायचीयं का? वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज

वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज

  • १) सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in येथे सर्च करून ‘७/१२ दुरुस्तीसाठी ई- हक्क प्रणाली’ अशी सूचना असते. त्याखालील https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे.
  • २) ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पेज उघडल्यावर ‘Proceed to login’वर क्लिक करून आधी स्वत:चे ऑनलाइन खाते उघडा. त्यासाठी ‘Create new user’वर क्लिक करून ‘New User Sign Up’वर सुरवातीला स्वत:ची माहिती भरावी. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून ‘check availability’ पर्यायावर क्लिक करून पासवर्ड टाका. मग Security Questionsमधील एका प्रश्नाचे उत्तर द्या.
  • ३) त्यानंतर मोबाईल, पॅनकार्ड नंबर, ई-मेल, पिन कोड टाका. देश, राज्य, जिल्हा टाकल्यावर ‘Select City’मध्ये गाव निवडा. त्यानंतर Address Detailsमध्ये घराची माहिती टाका. शेवटी कॅप्चा टाका आणि ‘सेव्ह’ म्हणा. त्यानंतर पेजखाली एक लाल अक्षरातील मेसेज दिसेल. त्यानंतर ‘Back’ बटणावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करा.
  • ४) नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड पुन्हा टाका. तसेच कॅप्चा टाकून लॉग-इन म्हणा. त्यानंतर ‘Details’चे पेज उघडेल. त्याठिकाणच्या पर्यायावरील ‘७/१२ mutations’वर क्लिक करा.
  • ५) ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असल्यास ‘User is Bank’वर क्लिक करा. एकदा यूझरचा प्रकार निवडल्यावर ‘Process’वर क्लिक करा, ‘फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क’चे पेज ओपन होईल. तेथील माहिती भरल्यावर ‘तलाठ्यांकडे ज्या फेरफारसाठी अर्ज करायचा तो वारस नोंद पर्याय निवडा. त्यानंतर वारस फेरफार अर्ज उघडेल.
  • ६) सुरवातीला अर्जदाराची माहिती भरून ‘पुढे जा’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक असेल. मेसेजखालील ‘ओके’ बटनावर क्लिक केल्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारावरील खाते क्रमांक टाका. पुढे ‘खातेदार शोधा’वर क्लिक करून मृताचे नाव निवडा.
  • ७) त्यानंतर संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत्यू दिनांक टाका. त्यानंतर ‘समाविष्ट करा’वर क्लिक करून खातेधारकाच्या जमिनीची माहिती तेथे दिसेल. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न येईल. होय, नाहीपैकी योग्य पर्याय निवडून ‘वारसांची नावे भरा’वर क्लिक करा.
  • ८) वारस म्हणून ज्यांची नावे लावायची आहेत, त्यांची माहिती भरा. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहा आणि मग जन्मतारीख टाका. वय टाकल्यानंतर पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पुढील माहिती भरून पोस्ट ऑफिस निवडा. त्यानंतर पुढील माहिती भरा.
  • ९) पुढे मृतासोबतचे नाते निवडा व शेवटी ‘साठवा’ (सेव्ह) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचे असल्यास तेथील ‘पुढील वारस’वर क्लिक करा आणि पूर्वीप्रमाणेच माहिती भरा व ‘साठवा’वर क्लिक करा.
  • १०) वारसांची नावे भरल्यावर ‘पुढे जा’वर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ’चे उतारेही लागतील.