जालना:- दि.26/09/2021 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याभरात सोयाबीन,उडीद,मूग, तूर ,गहू ,हरभऱ्याचे आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. उडदाचे सरासरी दर सहा हजाराच्या तर सोयाबीनचे सरासरी दर 4000 ते 7000 च्या दरम्यान राहीले.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तुरीचे मोठ्या प्रमाणात आवक होत असते 14 ते 18 सप्टेंबर 2021 च्या दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन चे चार वेळा मिळून पाच हजार 356 क्विंटल आवक झाली 773 ते 1997 क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी 4000 ते 7000 प्रति क्विंटल दर मिळाला.
हे वाचा:-महाराष्ट्रातील ही जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज
सोयापेंड आयातीवर बंदी घालण्याची शेतकऱ्यांची मागणी.
केंद्र सरकारने सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यामुळे बाजारातील सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयापेंड आयात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे दर पडले असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयापेंड आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला 11000 रुपये क्विंटल ने जाणारे सोयाबीन तीन हजार रुपये क्विंटल ने विकावे लागल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात भाव पडल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.