ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू .

 

 

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2021  नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक,आरोग्य,निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक राहणीमानचा जेष्ठ नागरिकावर व अतिशय ताण पडत आहे.आरोग्य व इतर गरजा भागवण्यासाठी आर्थिक परिस्थिती त्यांना सामना करणे भाग पडत आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासण्या न करता आल्यामुळे त्यांचे विविध आजार अगदी शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात परिणामी उपचार घेण्यास विलंब होतो. दुर्देवाने रुग्ण दगावण्याचा धोका असतो ही बाब लक्षात घेऊन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य विमा योजना सुरू करण्याचे शासनाने प्रस्तावित केले आहे.

हे हि वाचा:-जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे 55487.53 लाख अनुदान मंजूर

सदर योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिका करता प्रस्तावित करावयाच्या विविध चाचण्या तपासण्यास ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करणे तसेच योजनेचे आरोग्य विभागाच्या इतर योजना सोबत अभिसरण करणे इत्यादी प्रस्तावित आहे.

सदर योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक यांना जर भविष्यात काही आजार उद्भवले तर त्याचं निदान करून त्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न देता त्यांच्यावर उपचार करणे असे शासनाच्या विचाराधीन आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *