बीड: दि.16/09/2021 गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाचे कामकाज गतिशील होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण व त्याची माहिती संकलित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने बीड जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कामगारांचा जिल्हा असल्याने पथदर्शक स्वरूपात बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण केले गेल्यास राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याप्रमाणे कारवाई करण्यास सुलभ होऊ शकेल या करिता दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी माननीय मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री बीड जिल्हा यांनी प्रत्यक्ष दिलेल्या सूचनेप्रमाणे दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व ऊस तोडणी कामगार राज्यातील साखर कारखान्याकडे रवाना होणार असल्याने पुढील पंधरा दिवसांमध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामसेवक यांनी ऊस तोडणी कामगारांची माहिती सर्वेक्षणाच्या च्या अनुषंगाने भरून घ्यावी तसेच साखर कारखाना वर जाणाऱ्या ऊस तोडणी कामगारांचे स्वतंत्रपणे नोंदणीचा तपशील समाविष्ट करावा अशा सूचना दिल्या आहेत.
सदर सर्वेक्षण आधारे भविष्यातील विविध योजनाचा लाभ संबंधितांना देण्यात येणार आहे. तसेच सदरच्या माहितीच्या आधारे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू करण्यात यावयाचा या शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच त्यांचे हेल्थ कार्ड,ओळखपत्र व युनिक आयडेंटिटी क्रमांक देण्याची कारवाई केली जाणार आहे.
हे हि वाचा:-पिक विमा कंपन्यांना 12 हजार कोटी चा या हंगामात नफा विमा योजनेचा फक्त तामिळनाडूला लाभ
फॉर्म भरण्याकरता मार्गदर्शक सूचना
1. एका अर्ज हा एका कुटुंबासाठी असेल.
2. कुटुंब व्याख्या:- पती,पत्नी व त्याची अविवाहित मुले.
3. विवाहित मुलाचे स्वतंत्र कुटुंब समजावे.
4. वृद्ध आई-वडील ऊसतोडणी ला जात असल्यास त्यांचेही स्वतंत्र कुटुंब ग्राह्य धरावे.
5. मागील दोन-तीन वर्षात ऊसतोडणीला न गेलेले मात्र त्यापूर्वी किमान पाच वर्षे ऊसतोड करणाऱ्या मजुरांचा ऊस तोड कामगार यामध्ये समावेश करण्यात यावा.
6. ऊस तोड कामगार यांनी भरावयाचा फॉर्म खाली दिला आहे तो डाऊनलोड करून भरून आपल्या ग्रामसेवक यांच्याकडे जमा करावा.