पिक विमा कंपन्यांना 12 हजार कोटी चा या हंगामात नफा विमा योजनेचा फक्त तामिळनाडूला लाभ

पुणे: देशातील खासगी विमा कंपनीने गेल्या आठ हंगामामध्ये एक लाख सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विमा हप्त्यापोटी गोळा केले आहेत त्यातून 12 हजार कोटी रुपयांचा नफा मिळवल्यचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान कृषी विमा योजनेत 2016 17 पासून देशभर झालेल्या उलाढालीचा राज्याच्या कृषी विभागाने प्राथमिक अभ्यास केला आहे. “2016 ते 2020 या कालावधीत महाराष्ट्रात विमा कंपनीने विमा हप्त्यापोटी 21 हजार 322कोटी रुपये गोळा केले. यातून विमा कंपन्यांना 2885 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दिसून येते. मात्र,या कालावधीत केवळ  कंपन्यांचा नफा झाला असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण, पिक विमा भरपाईपोटी 18406 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेले आहेत अशी कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

चार राज्यांमध्ये वसुली पेक्षा वाटप जादा

उत्तर प्रदेश,बिहार,आंध्र, छत्तीसगड, हिमाचल, केरळ,मध्य प्रदेश, महाराष्ट्र,ओरिसा,राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. त्यात केवळ तामिळनाडूतील शेतकऱ्यांना विम्याच्या घसघशीत नफा झाल्याचे दिसून येते. याशिवाय आंध्र, बिहार,हरयाणा,भरपाईपोटी 179 कोटी पासून ते 1169 कोटी रुपयापर्यंत जास्त रक्कम वाटावी लागली आहे.

या जिल्ह्यला मिळणार पीक विमा रक्कम

शेतकर्यांना २०२१ ची पिक विमा रक्कम आज पासून वाटप होणार आहे. बीड जिल्ह्याला सदरचा विमा वाटप करण्यात येणार आहे.विम्या पोटी कंपनीने ३६० कोटी रुपयाचे दावे मंजूर केले असून एकूण जिल्यातील ५ लाख ५९ हजार ५३२ शेतकर्यांना मदत मिळणर आहे. परंतु २०२० ची रक्कम आणखी वाटप करण्यात आली नाही.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top