increase cow milk with jugaad:”या” जुगाडाने केली कमाल, गायी 40 टक्के अधिक दूध देतात

increase cow milk with jugaad

increase cow milk with jugaad | VR ग्लासची माहिती तरुणाईला हमखास आहे. तरुणाई झपाट्याने टेक्नोसॅव्ही होत आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी व्हीआर ग्लास खास तंत्रज्ञान आहे. पण रशियाच्या कृषी विभागाने एक जबरदस्त प्रयोग केला आहे. गायींना VR ग्लास लावून दूध उत्पादन वाढविण्याची ही नामी शक्कल कृषी विभागाने शोधली आहे.

“या” जुगाडाने केली कमाल, गायी 40 टक्के अधिक दूध देतात

येथे पहा व्हिडिओ

तर जग झपाट्याने टेक्नोसॅव्ही, तंत्रज्ञानकुशल होत आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान कधी कशी उपयोगी ठरेल हे सांगता येत नाही. असाच एक अभिनव प्रयोग रशियात सुरु आहे. रशियन कृषी विभागाने गायींचे दूध वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगिकार केला आहे. VR ग्लास हे तंत्रज्ञान सध्या तरुणाईत प्रचंड लोकप्रिय आहे. या तंत्रज्ञाना आधारे तरुणाईला मनोरंजनाचा खास आस्वाद घेता येतो. त्याचाच वापर गायीच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी करण्यात येत आहे. रशियाच्या कृषी विभागाने हा खास प्रयोग करुन उत्पादन वाढल्याचा दावा केला आहे. काय आहे, त्यांचा दावा जाणून घ्या…

सोशल मीडियावर घातला धुमाकूळ increase cow milk with jugaad

MindSet H2 नावाच्या युझरने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात गायींच्या डोळ्यावर VR ग्लास बसविण्यात आलेले दिसतात. आतापर्यंत या व्हिडिओला 13 लाखांहून अधिक लाईक्स आणि 5 हजारांहून अधिक कमेंट आल्या आहेत. पण अनेकांना यावर विश्वास बसत नाहीये. त्यांना वाटते केवळ व्हीआर ग्लास लावल्यावर कसं दूध उत्पादन वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या डेअरीवाल्याला, दूध टाकणाऱ्या दादा, काका, मामाला ही बातमी दाखवली तर त्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यात तुमचा पण एक फायदा होऊ शकतो. कदाचित तुमच्या दुधात कमी पाणी येईल. नाही का?

काय काम करते VR ग्लास

MindSet H2 युझरने याविषयीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यानुसार, गायींच्या डोळ्यांवर 24 तासांसाठी VR ग्लास सेट केल्या जातो. यामध्ये त्यांना हिरवे गवत, मैदानं यांचा व्हिडिओ दाखविण्यात येतो. त्यामुळे गायींना असा भ्रम होतो की, त्या खुल्या मैदानात आहेत आणि गायीचा मूड चांगला राहतो. त्यामुळे गाय अधिक दूध देतात. दूध देण्याची त्यांची क्षमता वाढते.

का पडली व्हीआर सेटची गरज ?

रशियामध्ये सर्वाधिक थंडी असते. गाय एकतर जास्त उष्णता अथवा थंडी सहन करु शकत नाही. त्यामुळे या गायींच्या डोळ्यांवर VR ग्लास चढविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना गवत आणि खुल्या मैदाने दिसावीत यासाठी हा जुगाड करण्यात येत आहे. त्याचा परिणाम दूध वाढीवर सुद्धा दिसून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *