highest land holder:भारतात सर्वात जास्त जमीन कोणाकडे आहे? 39 लाख एकर जमिनीचा मालक तुम्हाला माहित आहे का?

highest land holder
highest land holder:तुम्हाला माहित आहे का भारतात सर्वात जास्त जमीन कोणाचे आहे. सर्वात मोठा जमीनदार कोण आहे.
जमिनीच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. मुंबई-चेन्नईसारख्या सीटींमध्ये तर फारच कमी जमीन शिल्लक आहे. एका अहवालानुसार अहवालानुसार, 2030 पर्यंत, भारताला आपल्या नागरिकांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 40 ते 80 लाख हेक्टर अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असेल.

भारतात सर्वात जास्त जमीन कोणाकडे आहे?

येथे पहा

पण या सगळ्यात एक मुद्दा समोर आला तो म्हणजे सर्वाधिक जमीन असलेला शेतकरी. तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वात जास्त जमीन कोणाची आहे? सर्वात मोठा ‘जमीनदार’ कोण आहे?

यापेक्षा लहान देश अनेक आहेत

जगात असे किमान 50 देश आहेत ज्यांचे क्षेत्रफळ भारत सरकारकडे असलेल्या जमीनीपेक्षा कमी आहे. जसे- कतार (11586 sqk), बहामा (13943 sqk), जमैका (10991 sqk), लेबनॉन (10452 sqk), गांबिया (11295 sqk), सायप्रस (9251 sqk), ब्रुनेई (5765 sqk7), Bahra (5765 sqk7), सिंगापूर (726 sqk) इत्यादी.

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

जमिनीच्या बाबतीत भारत सरकारनंतर दुसरा कोण आहे? असा देखील प्रश्न आलाच असेल. तर हा ना कोणता बिल्डर आहे ना रिअल इस्टेट बिझनेसवाली व्यक्ती, पण कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया हा भारत सरकार नंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जमीन मालक आहे. हे देशभरात हजारो चर्च, ट्रस्ट, धर्मादाय संस्था, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये चालवते.
1972 च्या भारतीय चर्च कायद्यानंतर कॅथोलिक चर्च ऑफ इंडियाने मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली, ज्याचा पाया एकेकाळी ब्रिटिश सरकारने घातल्यों होता. ब्रिटिशांनी युद्धानंतर ताब्यात घेतलेली जमीन चर्चाला स्वस्त दरात भाडेतत्त्वावर दिली, जेणेकरून ते ख्रिस्ती धर्माचा प्रसार करू शकतील.

तिसऱ्या क्रमांकावर कोण?

वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. वक्फ बोर्ड ही एक स्वायत्त संस्था आहे ज्याची 1954 च्या वक्फ कायद्यानुसार स्थापन झाली आहे. ते देशभरात हजारो मशिदी, मदरसे आणि कब्रस्तान चालवते आणि या जमिनींचे मालक आहेत.

कोणत्या मंत्रालयाकडे सर्वाधिक जमीन आहे? highest land holder

आकडेवारी पाहिली तर रेल्वेकडे सर्वाधिक जमीन आहे. भारतीय रेल्वेकडे देशभरात 2926.6 चौरस किलोमीटर जमीन आहे. यानंतर संरक्षण मंत्रालय (लष्कर) आणि कोळसा मंत्रालय (2580.92 चौरस किलोमीटर) येतो. ऊर्जा मंत्रालय चौथ्या स्थानावर (1806.69 चौरस किलोमीटर), अवजड उद्योग पाचव्या स्थानावर (1209.49 चौरस किलोमीटर जमीन) आणि शिपिंग सहाव्या स्थानावर (1146 चौरस किलोमीटर जमीन) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *