UPI Payment : गुगलपे, पेटीएम आणि फोनपे चे 31 डिसेंबरपासून ऑनलाइन पेमेंट होणार बंद! काय आहे कारण?

UPI Payment

UPI Payment : आजकालच्या ऑनलाईन जगामुळे व्यवहार करणं सोपं झालं आहे. तुम्ही कधी कुठेही झटक्यात पैसै भरु शकता आणि काढूही शकता. लोक सहसा आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे अॅप वापरतात. जर तुम्हीही UPI द्वारे ऑनलाईन पेमेंट करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण 31 डिसेंबरपासून ऑनलाईन पेमेंट बंद होणार असल्याचं म्हटलं जातंय.

 

आता “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही

जाणून घ्या नवीन नियम

 

याशिवाय UPI आयडीही बंद होणार आहे.तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमच्या कोणत्याही UPI आयडीवरून कोणताही व्यवहार न केल्यास तो आयडी बंद केला जाईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

 

या परिपत्रकात म्हटलं आहे की, एक वर्षापासून सक्रिय न झालेले सर्व UPI आयडी 31 डिसेंबर 2023 पासून बंद होतील. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या UPI आयडीवरून वर्षभरात कोणतेही पेमेंट केलं नसेल, तर तुम्हाला ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी पुन्हा नोंदणी करावी लागेल.

NPCI, म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही भारतातील एक ना-नफा संस्था आहे. हे भारतातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम व्यवस्थापित करते. PhonePe, Google Pay आणि Paytm सारखी सर्व UPI अॅप्स NPCI मार्गदर्शक तत्त्वांवर कार्य करतात. या अॅप्सद्वारे होणारे सर्व व्यवहार NPCI द्वारे नियंत्रित केले जातात. एनपीसीआय देखील कोणत्याही प्रकारच्या वादाच्या बाबतीत मध्यस्थी करते. हे UPI अॅप्सद्वारे होणारे सर्व व्यवहार(UPI Payment) सुरक्षित आणि पारदर्शक असल्याची खात्री करते.

 

NPCI च्या मते, या निर्णयाचा उद्देश वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवणे हा आहे. अनेक वेळा वापरकर्ते त्यांचा जुना मोबाईल नंबर डिलिंक न करता नवीन UPI ​​आयडी तयार करतात. यामुळे त्या जुन्या आयडीचा वापर करून कोणीतरी फसवणूक करण्याचा धोका वाढतो. NPCI ला विश्वास आहे की 1 वर्षासाठी वापरलेले आयडी बंद केल्यानं हा धोका कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *