Women Empowerment Scheme Maharashtra:महिलांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महिलांना मिळणार मसाला कांडपसाठी 34 हजारापर्यंतची मदत;येथे करा अर्ज

Women Empowerment Scheme Maharashtra

Women Empowerment Scheme Maharashtra : राज्यातील महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासनाने काही अभूतपूर्व योजना यापूर्वीच सुरू केल्या आहेत.

‘या’ महिलांना मिळणार मसाला कांडपसाठी 34 हजारापर्यंतची मदत

येथे करा अर्ज

या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. दरम्यान मुंबई मधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर  माध्यमातून देखील आपल्या कार्यक्षेत्रातील गरजू लोकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात.Women Empowerment Scheme Maharashtra

आता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबई मधील महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी एक कौतुकास्पद योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून महिला व बालकल्याण योजना राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून  कार्यक्षेत्रातील जवळपास 27 हजार महिलांना शिलाई मशीन, मसाला कांडप तसेच घरघंटीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुंबई पालिकेच्या नियोजन विभागाकडून ही योजना राबवली जाणार असून यासाठी 44 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

किती मिळणार अर्थसाहाय्य

पालिकेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत मुंबई पालिकेकडून गरजू महिलांना मसाला कांडप यंत्र, घरघंटी, शिवण यंत्र यासाठी अर्थसाह्य दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून यंत्रसामग्रीच्या 95% किंवा घरघंटी – 19,058 रुपये, शिवणयंत्र 11,610 रुपये, मसाला कांडप यंत्र 33,742 रुपये यापैकी जी कमी रक्कम असेल ती महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून पुरवली जाणार आहे. म्हणजेच यंत्रासाठी लागणारी अतिरिक्त रक्कम ही या ठिकाणी लाभार्थी महिलांना स्वतः उचलावी लागणार आहे.Women Empowerment Scheme Maharashtra

कसे होणार वाटप

या योजनेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेकडून कार्यक्षेत्रातील गरजू महिलांना 12,632 शिवण यंत्र, घरघंटी – 12,482, मसाला कांडप – 1917, असे एकूण 27 हजार 31 यंत्र लाभार्थी महिलांना वाटप केले जाणार आहे. अर्थातच या योजनेअंतर्गत 27 हजार 31 महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे टारगेट महापालिकेने ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *