ration card payment:महाराष्ट्रातल्या ‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे;असा करा अर्ज

ration card payment

राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी हा नियम लागू असणार आहे.ration card payment

या निर्णयानुसार, जानेवारी 2023 पासून या 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.ration card payment

या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच एपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.

new crop insurance list: “या” शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; येथे पहा पात्र शेतकऱ्याची यादी मोबाईलवर

नवीन योजना कारण…

याआधी केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना प्राधान्य गटातील कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे दरमहा प्रती सदस्य 5 किलो अन्नधान्य, ज्यात 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देण्यात येत होते.

यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र सरकारच्या Non-National Food Security Act योजनेअंर्तगत करण्यात येत होती.

पण आता या योजनेअंतर्गत गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचं भारतीय अन्न महामंडळाला राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्यासाठीची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंत्योदय गट आणि प्राधान्य गट

या योजनेंतर्गत सुरुवातीला गरीब कुटुंबाला दरमहा 10 किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध करून दिलं जात होतं. यात प्रामुख्यानं गहू आणि तांदूळ दिले जातात.

1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट आणि प्राधान्य गट असे दोन गट करण्यात आले.

अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांना दरमहा 35 किलो अन्नधान्याचं वाटप करण्यात येतं, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्याना दरमहा प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचं वाटप करण्यात येतं.

Mobile tower installation : आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावा आणि महिन्याला 55000 ते 100000 रुपये भाडे घ्या

तीन प्रकारची रेशन कार्ड

महाराष्ट्रात तीन प्रकारची रेशन कार्ड आहेत. पिवळं, केसरी आणि पांढरं.

केशरी रेशन कार्डसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रुपये 15 हजार पेक्षा जास्त, पण एक लाखपेक्षा कमी असावं लागतं. यालाच एपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेवरील लाभार्थी म्हणतात. आताची सरकारची योजना ही एपीएल लाभार्थ्यांसाठीची आहे.

ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख आहे अशा कुटुंबाला पांढरं रेशन कार्ड देण्यात येतं.ration card payment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *