PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेला येणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता

PM kisan Samman nidhi Yojana

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा  हप्ता लवकरच  शेतकऱ्यांना मिळणार आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.पण जे शेतकरी E-KYC करणार नाहीत त्याना सदरचा हफ्ता मिळणार नाही.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत E-KYC करणे गरजेचे आहे.

👉11 वा हफ्ता कधी येणार व E-KYCकरण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

PM Kisan Samman Nidhi Yojna :  होळीनंतर, सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 11 वा  हप्ता हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै या महिन्यांसाठीचा 11 वा हप्ता असणार आहे.

काय आहे पीएम किसान योजना ?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांची असते. वर्षातून तीन वेळा  शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात. म्हणजे वर्षातून तीनदा, दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला होता. यामध्ये 10.09 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 20,900 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.

👉11 वा हफ्ता कधी येणार व E-KYCकरण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक आहे. शेतकरी पर्यायामध्ये, आधार आधारित ओटीपी पडताळणीसाठी ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक पडताळणीसाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधा. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यांनी पीएम किसान खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक अजून लिंक केला नसेल, तर तुम्ही तसे करू शकता.

फायदे मिळवण्यासाठी eKYC कसे अपडेट करावे

सर्वप्रथम पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर जा

पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.

तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा, कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा

आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका

OTP आल्यानंतर तो परत टाका

यासह, तुमचा आधार लिंक केला जाईल आणि तपशील अपडेट केला जाईल. OTP टाकताना कोणतीही त्रुटी आढळल्यास, तुम्ही CSC केंद्रांना भेट देऊन तुमचे बायोमेट्रिक अपडेट करू शकता.

👉11 वा हफ्ता कधी येणार व E-KYCकरण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *