कोव्हिड- 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास मिळणार 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान

कोव्हिड- 19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करणेबाबत शासनाने निर्णय घेऊन सदरच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे:- महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रुपये पन्नास हजार इतके सानुग्रह राज्य आपत्ती मदत निधी मधुन प्रदान करण्यास शसनाने मान्यता दिली आहे.

अटी व शर्ती पुढील प्रमाणे

१) Rt-pcr/RAT या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे क्लीनिकल डायगणोसिस covid-19 असे झाले होते याच व्यक्तीचे प्रकरण covid-19 मृत्यू प्रकरणासाठी covid प्रकरण म्हणून समजण्यात येईल.

२) वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या covid-19 प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात क्लीनिकल डायगणोसिस च्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू  समजण्यात येईल जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने covid-19 यांचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही.

३) Covid-19 चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असताना मृत्यू रुग्णालय झालेला असेल जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील covid-19 चा मृत्यू समजण्यात येईल.

४) Medical certificate and of cause of death (MCCD) मध्ये “covid-19 मुळे मृत्यू” या प्रमाणे नोंद नसली तरी वरील 2.1 ते 2.4 मधील अटीची पूर्तता होत असल्यास ती प्रकरणे पन्नास हजाराच्या सानुग्रह सह्यासाठी पात्र असतील.

वरील प्रमाणे शासनाचे निकष पूर्ण होत असतील तर अर्जदारास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळेल.

अर्जासोबत दाखल करावयाची कागदपत्रे/माहिती

1. अर्जदाराचा स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक.

2. अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील.

3. मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील.

4. मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यु प्रमाणपत्र.

5. इतर निकट नातेवाईकाचे ना हरकत असण्याचे स्वयंघोषणापत्र.

वरील प्रमाणे कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *