सरकारची मदत एकरी 1400 रुपये;शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

shetkari

शेतकऱ्याला सरकारची मदत एकरी चौदाशे रुपये

खताचे एक पोतं- 1900 रुपये

बियाणाची एक बॅग तीन हजार रुपये

एक फवारणी 2300 रुपये

आता तुम्हीच सांगा 1400 रुपयाच्या तिकडं काय काय झाकायचं? आणि कसं जगायचं

पुणे:- भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु या देशांमध्ये शेतकरी सोडता सगळे सुखी आहेत. भारता मधील सगळ्यात धोकादायक व्यवसाय कोणता असेल तर तो शेती आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते.

चालू वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, सोयाबीन ,बाजरी पीक घेण्याचे ठरवले. गेल्या वर्षी शेतकर्या जवळचे सोयाबीन संपल्यानंतर सोयाबीनला मोठ्या प्रमाणात भावा आला होता.  तीन चार हजार रुपये क्विंटल ने विकणारे सोयाबीन आठ ते दहा हजार रुपये क्विंटल ने विकले जात होते. जेव्हा सोयाबीनला भावा आला तेव्हा शेतकर्या जवळचे सोयाबीन संपले होते. याच्या मध्ये सगळा फायदा व्यापारी लोकांचा झाला.

शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. सोयाबीन ला असणारा भाव बघून शेतकऱ्यांनी सोयाबीन ला मोठ्या प्रमाणात खर्च केला. सोयाबीन सुद्धा चांगल्या प्रकारे आले परंतु मध्येच जुलै मध्ये पावसाचा खंड पाडला. ऐन फुले लागण्याच्या वेळेस पावसाचा खंड पडला असल्यामुळे उत्पादनात घट झाली. तोपर्यंत सोयाबीनला आठ ते दहा हजार रुपये भाव होता.

हे हि वाचा :-50% अनुदानावर करा शेळीपालन ;पहिल्या टप्प्यात मिळणार पाच जिल्ह्यांना लाभ

पावसाचा जुलै मध्ये पडलेला खंड संपुन पाऊस सुरू झाला. आलेल्या पावसामुळे शेतकरी देखील आनंदात होता परंतु निसर्गाची काही भरवसा नसतो. भारतातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. ऑगस्ट संपता संपता सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर सुरू झाला तरीदेखील बंद झाला नव्हता. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्याचे काढणीला आलेल्या पिकात देखील पाणी वाहत होते. शेतकऱ्याचे काढण्याच्या जवळ आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सगळ्या संकटाला सामोरे जात जात शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली. मिडीयात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनला आज एवढा भाव भेटला तेवढा भाव भेटला असे सांगितले जात होते. शेतकरी यांना वाटलं यंदा अतिवृष्टीमुळे पिक कमी निघाले तरी भावामुळे आपलं भागून जाईल. परंतु शेतकर्‍यांचे जसे पीक बाजारात यायला सुरु झाले तसे सोयाबीनचे भाव 11 हजार रुपये वरून तीन हजार रुपये वर आले.

शेतकऱ्यांनी केलेला मोठ्या प्रमाणात खर्च आणि सोयाबीनला मिळालेला भाव यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. शासनाने अतिवृष्टीची मदत म्हणून हेक्टरी दहा हजार रुपये घोषित केले परंतु शासनाने रक्कम देतानी एकरी काही ठिकाणी चौदाशे तर काही ठिकाणी तेराशे रुपये अनुदान दिले.

भरीस भर म्हणून विमा कंपन्यांनी देखील आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या हातावर एक दमडी ही टेकवली नाही. विमा कंपनी शेतकऱ्याच्या हिता संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यास तयार नाहीत. शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर 72 तासात विमा कंपनीला कळविणे गरजेचे आहे. परंतु विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास कुठलीही सीमारेषा आखलेली नाही. विमा कंपन्यांनी नुकसान झाल्यास किती दिवसात नुकसानभरपाई द्यावी याची कुठलेही प्रकारचे तजवीज   करून ठेवली नाही. विमा कंपनी फक्त शेतकऱ्यांना लुबाडण्याचा काम करत आहे.

शेतकऱ्यांना मालाला मिळणारा भाव व आस्मानी संकट यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. ज्यावेळस शेतकऱ्याकडे माल असतो त्यावेळेस मालाला भाव नसतो आणि शेतकऱ्याकडे माल  नसतो त्यावेळेस मालाला भाव येतो. हे चक्र सतत चालू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *