पुणे:- सुमारे 21 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम देण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेनंतर काही विमा कंपन्यांनी भरपाई वितरण सुरू केल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी दिली.
अतिवृष्टी तसेच अवर्षण यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आशा 38 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यापैकी नुकसानभरपाई निश्चित झालेला 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 1555 कोटीची मदतीची रक्कम दिवाळीपर्वी जमा करावी, अशी सूचना राज्य सरकारने विमा कंपनीना केली. त्यानंतर काही विमा कंपनीने नुकसान भरपाई वितरण सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा दादा भुसे यांनी व्यक्त केली. जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने तसेच सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे हवालदिल झालेल्या 38 लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तांत्रिक कारण पुढे करून शेतकऱ्यांना विमा नाकरणाऱ्या कंपन्यांना लगाम घालण्याची खबरदारी सरकारने घेतली आहे.
हे ही वाचा:-एक शेतकरी एक डीपी योजनेस मुदतवाढ
गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यासाठी पाच हजार 800 कोटी चा पिक विमा उतरविण्यात आला होता. विमा कंपनीने मात्र नियमांवर बोट ठेवत असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत लाखो शेतकऱ्यांना पिक विमा लाभापासून वंचित ठेवले. परिणामी शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ सातशे पन्नास कोटींची भरपाई मिळाली होती. त्यामुळे यंदा कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत जुलै मध्ये पावसाअभावी पिके धोक्यात आली तेव्हा 23 जिल्ह्यात आधिसुचना काढून पिके संकटात असल्याचे विमा कंपनीचे निदर्शनास आणून दिले.
रकमेची तजवीज आशी
राज्यात यंदा 84 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांचा 4500 कोटीचा विमा उतरविण्यात आला आहे. सहा विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचे शेतीचे 441 कोटी राज्य सरकारचे 973 कोटी आणि केंद्राचे 899 कोटी असे एकूण 2313 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आले आहे.