एक शेतकरी एक डीपी योजनेस मुदतवाढ

transformer electricity

महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक चार जुलै 2021

राज्यात महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप विज जोडणी देण्याकरता सुरू असलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

उच्च दाब वितरण प्रणाली योजना 5 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार राज्यात राबविणे सुरू आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 पर्यंत पैसे भरून वीज जोडणी करता प्रलंबित असणाऱ्या कृषी पंप अर्जदारांकरता राज्यात राबविण्यात येत आहे.

हे वाचा:-या झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये बघा ते कुठले झाड आहे.

उच्च दाब वितरण प्रणाली योजना ही मूळ योजना 5048.13 इतकी मंजूर होती. आता ही योजना 4734.61 कोटी इतकी झाली आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गवारीतील लाभार्थींच्या प्रस्तावित संख्येत प्रत्यक्ष सर्वेक्षणाअंती घट आढळल्याने महावितरण कंपनीकडे शिल्लक असलेल्या अनुदानाची रक्कम उर्वरित राज्यातील या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता तसेच  1 एप्रिल 2018 नंतर पैसे भरून वीज जोडणी करता प्रलंबित असणाऱ्या अनुसूचित जाती व जमाती वर्गवारीतील लाभार्थ्याकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे विदर्भ व मराठवाडा विभागातील अनुसूचित जाती व जमाती वर्गवारीतील लाभार्थ्यांची संख्या प्रत्यक्षात कमी आढळल्याने सर्वसाधारण लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने शासनाकडून महावितरण कंपनीस देण्यात येणारे अनुदाना मध्ये  रुपये 780.73 कोटी इतकी वाढ झाली आहे. ही अतिरिक्त वाढीव खर्च अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *