बीड:-संपूर्ण राज्यभरात शेतीचे पंचनामे तात्काळ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासन आर्थिक अडचणीत आहे तरी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने सढळ हाताने आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला सोयाबीन कापूस याचा घास शेतकऱ्यापासून हिरावला गेला आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात सात हजार 800 कोटी ची मदत मिळावी अशी पत्र केंद्र सरकारला पाठवले आहे. अंतिम मदतीची दुसरे पत्र पाठवलेले जाईल अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
हे हि वाचा:-या झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये बघा ते कुठले झाड आहे.

सध्या शेतकरी अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या अतिवृष्टीमुळे पंचनामे सुरू आहेत परंतु पिक विमा कंपन्या देखील शेतकऱ्याला विमा देण्यास टाळाटाळ करत आहेत गेल्या वर्षी देखील अतिवृष्टी झाली होती परंतु पिक विमा कंपनीने एक रुपयेही शेतकऱ्यांना दिला नव्हता. यंदा पिक विमा कंपनीने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी कडून व्यक्त होत आहे.