दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करू नका प्रशासनाचे शेतकऱ्यांना आव्हान

पुणे:-पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी,नागरिक यांनी खबरदारी घ्यावी.विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे.पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये.कारण सदर कालावधीमध्ये वीज पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली /पाण्याचे स्त्रोताजवळ /विद्युत खांबाजवळ बांधू नये त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावित. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित, करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आश्रय घ्यावा असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

हे वाचा:-उत्तर भारतात कापसाला मिळतोय 6000 ते 7000 रुपये दर

 

पुढील दोन-तीन दिवसात चांगले पावसाची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील काही मध्यम प्रकल्प बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत व काही मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली असून परिस्थितीनुरूप केव्हाही प्रकल्पातील पाणी विसर्ग करावे लागणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकडच्या सर्व  गावांनी सतर्क राहावे. संभाव्य पूर परिस्थिती व वीज पडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन नागरिकांनीच काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *