गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्र प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची लागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादन उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कापसाचे मोठी आवक 15 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात आवक ऑगस्टमध्ये सुरू झाली असून दर हे सहा हजार रुपयांच्या वर आहेत. सध्या देशातल्या कापड कारखान्यांकडे 60 ते 70 लाख कपाशीच्या गाटी उपलब्ध आहेत.
हे वाचा:-महाराष्ट्रातील आजचे रेशीम कोष मार्केटचे दर
कारखान्याकडे साधारणपणे दोन महिने पुरेल इतका माल शिल्लक आहे.भारतासह पाकिस्तान मध्ये वेचणीला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने निर्यातीला चालना देणारे धोरण लागू केल्याने यंदा देशातून कापसाचे निर्यातीला चांगली संधी आहे अशी माहिती तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाने गुजरात मधील कापड उद्योगाच्या हवाल्याने दिली आहे. चालू वर्षी cci ने कापसाच्या 75 लाख गाठी निर्यात केले आहेत अशी माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.