पंजाब नॅशनल बँकने (पी एन बी) चेक बुक संदर्भात मोठी घोषणा केली. पंजाब नॅशनल बँकेचे जुने चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यापूर्वी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे विद्यमान चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार असल्याची घोषणा केली होती.त्यानंतर पीएनबी ही घोषणा केली.
हे वाचा:-देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700 च्या दरम्यान भाव
जर तुमच्याकडे या बँकांची जुनी चेक बुक असतील तर नवीन चेक बुक साठी अर्ज करा जेणेकरून तुम्हाला पुढे व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही बँकेत जाऊन तुम्ही नवीन चेकबुक मिळू शकतात एप्रिल 2020 रोजी ओबीसी आणि ubi चे pnb मध्ये विलीनीकरण झाले.