या तेल बिया पिकाची केली लागवड तर मिळणार एकरी तीन हजार रुपये अनुदान

वाशिम:-या रब्बी हंगामात क्लस्टर निवड करून वाशीम जिल्ह्यात करडई या पिकाचा पेरा किमान 5000 हजार एकर पर्यंत करण्याचे नियोजित आहे.तेलबिया उत्पादन प्रक्रिया व विक्री प्रकल्पांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या समन्वयातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

करडईची क्षेत्र वाढवत असताना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात प्रती एकर तीन हजार रुपयांचा लाभ डीबीटी द्वारे दिला जाणार आहे तरी करडई पेरणी करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर   https://mahajyoti.org.in/en/notice-board/ ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.

हे हि वाचा:-ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू

करडईच्या फुलांना मिळतो 400 ते 700 रुपये किलो दर

करडईच्या फूलाचा वापर हर्बल टी मध्ये होत असल्यामुळे चारशे रुपये पासून सातशे रुपये किलोपर्यंत करडईचे फुले खरेदी केली जातात. शेतात उत्पादित होणारी करडई त्याला मिळणारा भाव व फुलाला मिळणारा भाव सारखाच असतो. बिनकाटे ची नवीन जात आल्यामुळे त्याची रास करणे ही शेतकऱ्यांना सोपे जाते. सर्वसाधारपणे हेक्टरी सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *