देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700 च्या दरम्यान भाव

        सध्या बाजारात येणार सोयाबीन पैकी ज्या मालाला आर्द्रता अधिक आहे आणि गुणवत्ता कमी आहे त्याच सोयाबीनचे दर किमान पातळीवर  आहेत. गुणवत्तेचे सोयाबीन देशभरातील बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे ते सात हजार 300 रुपये दराने विकले जाते.

मागील हंगामात शेतकऱ्याची सोयाबीन बाजारात येऊन गेल्यानंतर दराने उसळी घेतली. फेब्रुवारीपासून दरात सातत्याने वाढ होत गेली आणि जुलै महिन्यात विक्रमी दहा हजाराचा टप्पा गाठला मात्र जनुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी आणि खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली त्यामुळे बाजारात पॅनिक निर्माण केले गेले आणि व्यापाऱ्यांच्या हाती आयते कोलीत मिळाले. आणि व्यापार्‍नी सोयाबीनचे भाव पाडायला सुरुवात केली. सुरुवातीला अकरा हजार रुपये सोयाबीनचा दर मिळाला होता परंतु नंतर जसा सोयाबीनचे आवक येत गेली बाजार समितीमध्ये तसतसे सोयाबीनचे दर कोसळत गेले.

हे वाचा:-या तेल बिया पिकाची केली लागवड तर मिळणार एकरी तीन हजार रुपये अनुदान

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय सोयापेडला मोठी मागणी असते. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीन पेक्षा भारतीय सोयाबिनला जास्त दर असतो मागील हंगामात उत्पादन घट झाल्याने मोठी टंचाई निर्माण झाली त्यामुळे यंदा सोयाबीनचे शिल्लक साठा नगण्य आहे त्यातच नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या सोयाबीन विकण्याची घाई करू नये भविष्यात सोयाबीनला दहा हजार रुपये भाव मिळू शकतो असे जाणकार व्यक्ती सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *