Forest Guard Recruitment 2023:सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. वनविभागात बंपरभरती होणार आहे.
Forest Guard Recruitment 2023: वनविभागात नोकरी करू इच्छिनाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. कर्नाटकमध्ये फॉरेस्ट गार्ड पदासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे. या पदासाठी एक डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही तुमचा अर्ज aranya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तीस डिसेंबरपर्यंत भरू शकता.
वनविभागनं फॉरेस्ट गार्ड या पदासाठी 540 जागांसाठी भरती काढली आहे. असा कोणताही व्यक्ती जो वन विभागानं या पदांसाठी ठरून दिलेल्या अटी पूर्ण करेल तो या पदासाठी अर्ज करू शकतो. या पदांसाठी 18 ते 27 इतकी वयोमर्यादा आहे. आरक्षित प्रवर्गाला यामध्ये काहीप्रमाणात सूट देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करताना सर्वसामान्य प्रवर्गातील पुरुष उमेदवाराला दोनशे इतके तर सर्वसामान्य प्रवर्गातील महिला उमेदवाराला शंभर इतके शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवाराला यामध्ये सूट देण्यात आली असून, पुरुष उमेदवाराला 100 रुपये आणि महिला उमेदवाराला पन्नास रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.
वनविभागात निघाली बंपर भरती

जाहिरात पाहण्यासाठी
वनविभागात नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर तुमची सर्व प्रथम लेखी परीक्षा होईल त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची नंतर फिजिकल टेस्ट होईल. या परीक्षा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मिरीटनुसार निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 23,500 ते 47,650 या श्रेणीमध्ये मासिक पगार मिळणार आहे.