महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालगड आणि धुळे येथे मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील विविध भागात पावसासाठी हवामान विभागाने रेड, यलो आणि ऑरेंज असे तीन प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत. छिंदवाडा, निवारी, रायसेन आणि नर्मदापुरममध्ये आज पावसाचा रेड अलर्ट आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता इंदूर, नर्मदापुरम आणि हरदा येथे शनिवारी शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तवा धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.Weather Forecast
मान्सून परतण्याचं कारण काय?
स्कायमेटचे हवामान शास्त्रज्ञ महेश पलावत म्हणाले की, अचानक मान्सून परतण्याचं कारण म्हणजे बंगालचा उपसागर आहे. कारण तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस पडत आहे. महेश पलावत म्हणाले की, दिल्ली एनसीआरमधील बदललेल्या हवामानामुळे तापमानात थोडीशी घसरण होईल, पण आर्द्रता कायम राहणार आहे.