महाराष्ट्रबाराखडी उद्योजकतेची या पुस्तकाचा मुखपृष्ठ अनावरण सोहळा संपन्न admin3 years ago3 years ago01 mins mins बाराखडी उद्योजकतेची उद्योग व्यवसाय म्हणजे काय ? स्टार्टअप्स आणि पारंपरिक उद्योग व्यवसाय यात फरक कोणता ? उद्योग व्यवसाय उभारणी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात ? उद्योग व्यवसायाची निवड कशी करावी ? भांडवल उभारणीचे मार्ग कोणते ? उद्योग व्यवसायाच्या नाव,लोगो ची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात ? आपल्या व्यवसायाचा ब्रँड कसा बनवावा ? व्यवसाय करताना आर्थिक शहाणपणा कसा असावा ? व्यवसायातील भागिदारी , व्यवसाय व्यवस्थापन, येणाऱ्या अडचणी त्यावरील मार्ग इ. उद्योजकतेशी निगडीत सर्वसमावेशक प्रत्येक गोष्टीची माहिती सहजसोप्या भाषेत देणारं आणि प्रत्येक संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करत उद्योजकीय प्रवासाचा रोडमॅप असणारं श्री विजय पवार लिखित ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ अनावरणाचा सोहळा ‘पुस्तकविश्व’ कोथरूड येथे दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. रुद्र एंटरप्राइजेस आणि पुस्तकविश्व प्रकाशित हे पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती येईल अशी माहिती कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडणारे पुस्तकविश्वचे संचालक नवनाथ जगताप यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुस्तकविश्व येथे सायन्स कीट या नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.सतिश पवार सर (डायरेक्टर- स्टर्लिंग सिस्टीम, पुणे) यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगात गोडी निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोग साहित्याचा खजिना अगदी कमी किमतीत या सायन्स कीटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सचिन म्हसे यांनी वाचनचळवळ आणि वाचनसंस्कृती जोपासन्यासाठी जे उपक्रम चालवले जातात त्याबद्दल माहिती दिली.यानंतर मा.सतिश पवार सरांनी ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले. अतिशय आकर्षक असणारे मुखपृष्ठ विकास आगवणे यांनी बनवले आहे. अनावरणावेळी मनोगत व्यक्त करताना सदर पुस्तक चालू काळातील उद्योगोच्छुक प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गरज सहजसोप्या भाषेत पुरवणार असल्याचे सतिश पवार सरांनी सांगितले. तसेच या पुस्तकाला प्रस्तावना लिहताना पुस्तकाची उपयुक्तता प्रत्येक वाक्यानिशी जाणवली आणि हे पुस्तक मराठी उद्योजकीय मार्गदर्शक म्हणून इतिहास घडवेल असे प्रतिपादन सतिश सरांनी केले. पुस्तक लिहिण्यामागची भूमिका , स्वतः व्यवसाय करताना आलेले अनुभव अगदी नेमक्या शब्दांत लेखक विजय पवारांनी मांडले. सदर कार्यक्रमासाठी अभिजीत सोनवणे, चंद्रकांत कुलकर्णी, आरती जगताप, मनिषा सरदार, टीम पुस्तकविश्व उपस्थित होते. उद्योजकता विषयावरील परीसंवादाने कार्यक्रमाची सांगता झाली. Post navigation Previous: ‘या’ झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये; बघा ते कुठले झाड आहे.Next: अखेर दहावीचा निकाल जाहीर! केवळ आईचे नाव टाकून निकाल येथे डाउनलोड करा ! Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin2 years ago 0
PM-KISAN Yojana PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर admin2 years ago 0
ST Bus News ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय admin2 years ago 0
SBI Bank 2023 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा admin2 years ago 0