Bank Account Rules: 1 जानेवारीपासून खात्यातून “एवढे” दिवस व्यवहार न केल्यास बंद होणार अकाउंट?जाणून घ्या काय आहे RBIचा नवीन नियम

Bank Account Rules

Bank Account Rules : सामान्यतः नोकऱ्या बदलताना, नोकरीत बदली किंवा इतर कारणांमुळे आपण नवीन खाते उघडतो आणि जुन्या खात्याकडे दुर्लक्ष करू लागतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार चालू वेतन किंवा बचत खाते सुरळीतपणे सुरू राहणे आवश्यक असते. तथापि, सर्व बँक खात्यांसाठी यासंबंधीचे नियम वेगळे आहेत. नियमांनुसार KYC साठी दोन वर्षांतून एकदा बँक शाखेला भेट देणे अनिवार्य आहे.

“एवढे” दिवस व्यवहार न केल्यास बंद होणार अकाउंट?

जाणून घ्या काय आहे RBIचा नवीन नियम

बँकिंग सुविधेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. घरातील लॉकर ऐवजी बँकेत मोठी रक्कम ठेवणे सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते असेल, तर नोकरदार लोक एकाधिक खातीही उघडतात. परंतु कालांतराने लोकांनी काही बँक खाती वापरणे बंद केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, जर एखादी व्यक्ती आपले बँक खाते दीर्घकाळ वापरत नसेल, तर ते किती दिवसांत बंद होते?

निष्क्रिय खाते पुन्हा सुरू कसे करावे

कोणतेही निष्क्रिय खाते पुन्हा नियमित खात्यात सहजपणे रूपांतरित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन KYC करून घ्यावे लागेल आणि त्यासाठी पॅन, आधार यासारखी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील. तसेच संयुक्त खाते असल्यास दोन्ही खातेधारकांना केवायसी कागदपत्रे सादर करावी लागतील.

बँक खात्याबाबत नियम काय आहे Bank Account Rules


बँकेतील प्रत्येक खात्याबाबत व्यवहार न केल्यास किती दिवसांनी खाते निष्क्रिय केले जाईल याबाबत नियम निर्धारित करण्यात आले आहेत. बँकांकडून ग्राहकांच्या पासबुकमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. वेगवेगळ्या खात्यांबाबत नियम वेगवेगळे असू शकतात, पण एक निश्चित नियम अवश्य असेल. बँक खात्यांच्या नियमांनुसार कोणीही तुमच्या खात्यात पैसे जमा करू शकतं, तुम्ही स्वतःही जमा करू शकता, पण खात्यातुन पैसे काढणे आवश्यक आहे.

प्रत्येक दोन वर्षात खात्यातून पैसे काढले पाहिजे आणि बंद होऊ नये याची काळजी घ्यावी. पैसे काढले नाही तर तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. तर एकदा खाते निष्क्रिय झाले की ते पुन्हा सुरू करण्यासाठी KYC करणे आवश्यक असून पैसे काढल्यानंतर खाते पुन्हा चालू होते. निष्क्रिय खाते पुन्हा नियमित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. याशिवाय आरबीआयच्या नवीन नियमांनुसार तुम्ही निष्क्रिय खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तरीही बँक कोणताही दंड वसूल करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *