crop insurance:अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाई देणार 27 हजार प्रतिहेक्टर, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

crop insurance

crop insurance:जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी… राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशातूव शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कधी जून-जुलैमध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं- पीकांचं मोठं नुकसान होतं. यासाठी आधी सरकारकडून जी मदत दिली जायची ती आता आली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. शासनाने एसडीआरएफ नियमात बदल करून प्रति हेक्टर मदत वाढण्याचा आदेश काढला आहे.

‘हे’ ठुमके पाहुन ‘ओ अंटावा’ देखील विसरून जाल; ‘कुर्ची मदातापेट्टी’ सगळ्यांचे होश उडवणार,पहा व्हिडिओ

बागायतीसाठी किती भरपाई मिळणार?

तुमची जमीन जर बागायती असेल तर तुमच्या पीकांच्या नुकसानीसाठी सरकारने तरतूद केली आहे. बागायती पीकांच्या नुकसानीसाठी आधी प्रति हेक्टरी 17 हजार रूपये नुकसान भरपाई दिली जात होती. आता ती वाढवण्यात आलाी आहे. 27 हजार प्रतिहेक्टर ही मदत सरकार देणार आहे. ही नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे.

जिरायतीच्या भरपाईत किती वाढ? crop insurance

जिरायती जमीन जर तुम्ही पीक घेतलं असेल. त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल. तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आधी प्रति हेक्टरी मर्यादा 8 हजार रूपये मदत शेतकऱ्यांना मिळत होती. आता ती 13 हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मर्यादा दोन हेटक्टर पर्यंत असणार आहे.

बहुवार्षिक पीक नुकसान झालं असेल. तर त्यासाठी आधी प्रति हेक्टरी 22 हजार 500 रूपये मदत सरकारकडून दिली जायची ती आता वाढवली गेली आहे. आता 36 हजार प्रति हेक्टर अशी ही मदत दिली जाणार आहे. 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानासाठी ही मदत दिली जाईल.

नुकसान भरपाईत वाढ

आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे पिकं चांगली येतात. पण हाच पाऊस जर जास्त प्रमाणात पडला तर मात्र पिकांचं मोठं नुकसान होतं. या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडतो. आर्थिक संकटामुळे शेतकरी अनेकदा आत्महत्येचा मार्ग स्विकारतो. पण आता या सगळ्यावर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पिकांचं नुकसान झालं असेल तर सरकारकडून देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. सरकारने तसा अध्यादेश जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *