msrtc fare hike:एसटीचे तिकिटामध्ये मोठी वाढ, पहा किती रुपयांनी वाढले तिकीट

msrtc fare hike

msrtc fare hike:एसटी महामंडळाने दिवाळीच्या सणात हंगामी दहा टक्के भाडेवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसला असून पूर्वीच्या भाड्यात ३० ते ७० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. मात्र, ही वाढ काही दिवसांपुरतीच आहे. असे असले तरी खासगी प्रवासी वाहने आणि ट्रॅव्हल्स मालकांनाही भरघोस दरवाढ केली आहे.

दिवाळी सणासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या पाहता एसटी बसेसना गर्दी वाढली आहे. एसटी महामंडळाने महसूलवाढीसाठी दरवर्षीप्रमाणे १० टक्के भाडेवाढ केली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या तिकीट दरात ३० तर पुण्यासाठी ७० रुपयांची वाढ झाली आहे. एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीत महसूलवाढीसाठी हंगामी भाडेवाढ करते. यावर्षी हिंगोली आगाराने सात नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू केली आहे, ती २७ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे.

pm kisan encrese amount 2023 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता; हप्त्यातही होणार तब्बल एवढी वाढ…

ऐन दिवाळीत झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांतून नाराजी आहे. मात्र, एसटी महामंडळ प्रवासात सवलत देते. त्याचा लाभ प्रवाशांना होतो. एसटी महामंडळाला महसूलवाढीसाठी हंगामी भाडेवाढ करावी लागते, असे महामंडळाचे अधिकारी सांगत आहेत.

एसटी महामंडळाने केलेली भाडेवाढ msrtc fare hike

हिंगोली आगारातील भाडे व कंसात पूर्वीचे भाढे पुढीलप्रमाणे – परभणी १२५ (११५), नांदेड १४५ (१३०), छत्रपती संभाजीनगर ३७० (३४०), पुणे ७६० (६९०), सोलापूर ५९० (५३५), लातूर ३७० (३४०), बीड ३४० (३७०), अमरावती ३७० (३१०) या प्रमाणे असल्याचे वाहतूक निरिक्षक फिरोज शेख यांनी सांगितले.

एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ म्हणून दहा टक्के भाडेवाढ केली आहे. ऐन दिवाळीत झालेल्या भाडेवाढीचा फटका बसत आहे. मात्र, एसटी वर्षभरात प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असल्याने प्रवाशांना फायदा देखील होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *