gautami patil payment:गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा आहे. गौतमी पाटील चा डान्स पाहता यावा म्हणून अनेक ठिकाणी तरुणांनी गोंधळ केला होता. मात्र तिचे नृत्य अश्लील असते म्हणून तिचे कार्यक्रम बंद करावेत अशी मागणी जोर धरताना दिसली होती. काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र निमगाव केतकीच्या ग्रामस्थांनी गौतमीच्या कार्यक्रमासाठी जागाच दिली नव्हती. या निर्णयामुळे गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येऊ लागली अशी चर्चा सर्वत्र रंगली.
अबब! गौतमी पाटील एका लावणी शोचे घेते
तब्बल एवढे पैसे पाहण्यासाठी
गौतमीने आपल्या कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या विरोधावर एक उत्तर दिलं आहे. ‘ माझ्या कार्यक्रमाला महिला देखील येतात, महिलांना माझा डान्स आवडतो. माझ्या कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही पाहिलं तर माझी साडी अगदी व्यवस्थित नेसलेली असते आणि आता माझ्या डान्समध्ये बरीच सुधारणा झाली असून त्यात कुठलाही अश्लीलपणा तुम्हाला जाणवून येणार नाही.gautami patil payment
त्यामुळे माझ्या कार्यक्रमांवर बंदी का घातली जाते हेच मला कळत नाही. मी लावणीचे कार्यक्रम करतीये हा लोकांचा मोठा गैरसमज आहे. मी जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हापासून मी डीजेवर डान्स करते. मी लावणी करते हा लोकांचा गैरसमज आहे, मला वेस्टर्न डान्स आवडतो आणि बऱ्याच कार्यक्रमात आयोजक जशी गाणी लावतात तशा गाण्यांवर मला डान्स करावा लागतो. पण आजकाल झालेल्या घटनांमुळे मला चांगलाच मनस्ताप झाला आहे त्यामुळे मला अगोदरचीच गौतमी जास्त आवडते. तेव्हा खूप शांत होतं हा सगळा गोंधळ नव्हता. लोकांना मी एवढंच सांगते की माझा लावणीशी काहीच संबंध नाही.’
गौतमी पाटील सरकार या गाण्यातून झळकली आहे. हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या गाण्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच ट्रेंडमध्ये आलं आहे असे ती म्हणते. माझा आणखी एक घुंगरू नावाचा चित्रपट दाखल होत आहे यात लोककलावंतांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा चित्रपट लोकांना आवडेल असे ती म्हणते. गौतमी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यभर दौरे, कार्यक्रम यांमुळे गौतमीकडे खूप काम आले आहे. यातून आता ती भरपूर पैसे कमावते आणि ती श्रीमंत देखील झाली आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला.gautami patil payment
लहानांपासून तरूण आणि म्हाताऱ्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते माहितीये का?gautami patil payment
आपल्या डान्सनं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अन् खेड्यापाड्यात क्रेझ आहे.