Headlines

Pm kisan 2023:हे काम न केल्यास पी एम किसान योजनेचे 12 हजार विसरा,हे कागदपत्रे न जोडल्यास यादीतून नावे वगळणार

Pm kisan 2023

Pm kisan 2023:पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केवायसी आणि आधार सीडींग करून घेणे अनिवार्य आहे. या संदर्भात वारंवार सूचना देऊनदेखील पात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. केवायसी व आधार सीडींग न केल्यास राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. त्यांची नावे यादीमधून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे बारा हजार रुपयांवर पाणी सोडावे लागू शकते.

हे काम न केल्यास पी एम किसान योजनेचे 12 हजार विसरा

येथे पहा यादी

पीएम किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा १४ वा हप्ता जुलैमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला. परंतु केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांनी ई – केवायसी तसेच बँक खात्याला आधार जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, विविध कारणास्तव ई – केवायसी व आधार जोडणीला वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई – केवायसी व बँक खात्याची आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन कामशेतचे कृषी मंडल अधिकारी वसंत मोरे यांनी केले आहे.Pm kisan 2023

अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरवात झाली. २ हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.

नोंदणी कशी करावी? Pm kisan 2023

१. सर्व प्रथम अर्जदारास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

२. त्यानंतर मुखपृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर उघडेल.

३. मुखपृष्ठावर ‘शेतकरी कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.

४. यापैकी तुम्हाला नवीन ‘शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल.

५. या फॉर्ममध्ये आपल्याला आपला ‘आधार नंबर’ भरावा लागेल आणि विचारलेल्या सर्व माहिती पूर्ण कराव्या लागतील.

६. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ‘सबमिट’ बटणावर क्लिक करावे लागेल.

७. ‘नोंदणी फॉर्मची एक प्रिंट आउट घ्या’ आणि भविष्यासाठी जतन करा.

८. अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल.

‘ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई – केवायसी व आधार सीडींग केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी व आधार सीडींग करून घ्यावे नाहीतर पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेता येणार नाही. ज्यांनी अद्याप योजनेचा लाभ घेतला नाही त्यांनी नवीन नोंदणी करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *