Headlines

Gold prices down:सोने झाले स्वस्त, खरेदी करण्यासाठी लागली लोकांची रांग, येथे पहा आजचे सोन्याचे भाव

Gold prices down

Gold prices down: जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत बाजारात मागणीत आलेल्या कमीमुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसत आहे. मौल्यवान धातूच्या किमती सात महिन्याच्या नीचांकी पाळतीवर आपटल्या असून ibja नुसार देशांतर्गत बाजारात किंमत ५४ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरू शकतात.

सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण

पहा आजचे सोन्याचे भाव

 

देशभर सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी पडझड झाली आहे. अमेरिकन डॉलरमधील मजबुती आणि अमेरिकन डॉलर निर्देशांक ११ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव असून किमती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आपटल्या आहेत. अशा परिस्थितीत सणोत्सवात ग्राहकांना खरेदीवर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत असून किंमतीत घट नोंदवली गेली.

जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन दर प्रति औंस $१,८१५ पर्यंत पोहोचले ज्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आणि ९९५ प्रति १० ग्रॅम सोने ५६ हजार ४४८ रुपयांवर तर चांदीचा भावही चार टक्के घसरून ६६ हजार रुपयांच्या पातळीवर आला आहे.

सोन्याच्या किमती किती कमी होऊ शकतात?Gold prices down


सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ibja चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, सोन्याचा भाव आगामी काळात प्रति औंस १७८४ डॉलर म्हणजेच भारतीय बाजारात ५४ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. निधीची व्यवस्था करण्यासाठी अमेरिकेत पॅनिक सेलिंग केले जात आहे, जे थांबले की सोन्याचे भाव पुन्हा वाढतील. अशा परिस्थितीत खरेदी करण्याची संधी आहे.

दुसरीकडे GJC चे अध्यक्ष संयम मेहता म्हणतात की सोन्याचा भाव प्रति औंस $१७९५ वर जाऊ शकतो. पितृपक्षामुळे सोन्याच्या घसरलेल्या किमती किरकोळ काउंटरवरही चमक दाखवत नाहीत. अशा परिस्थितीत GJC ने दिवाळी एडिशन लाँच केले, जेणेकरून सोन्याच्या कमी किमती B-2-B मागणी वाढवण्यात यशस्वी होऊ शकतील. तसेच अमेरिकन व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर डॉलरची व्यापक मजबूती आणि उच्च कोषागार उत्पन्नामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आपटले असल्याचे केडिया कमोडिटीचे प्रमुख अजय केडिया यांनी म्हटले. अमेरिकन डॉलर निर्देशांक ११ महिन्यांच्या विक्रमी उच्चांकावर चढल्यामुळे सोन्या-चांदीचे दर दबावाखाली आले आहेत असे केडिया यांचे मत आहे.

gold silver price

Gold Price: चांगली बातमी!सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण, सोने ७ महिन्यांच्या नीचांकावर, पहा आजचे सोन्याचे भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *