Crop Insurance 2023:पीक विम्याच्या अग्रीम भरपाईचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनत आहे. विभागीय आयुक्तांनी अग्रीम भरपाईबाबत दिलेला निकालही विमा कंपन्यांना सरकट मान्य दिसत नाही. विभागीय आयुक्तांचे निकाल मान्य नसल्याने विमा कंपन्या अग्रीम भरपाईबाबात आता सचिवांकडे अपिल करत आहेत. बीड, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांच्या अपीलावर सुनावणी पार पडली. तर विमा कंपन्यांनी सांगली, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात अग्रीम भरपाई देण्यास तयारी दर्शविली आहे, असे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
“या” 16 जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा
येथे पहा कोणते जिल्हे पात्र आहेत
पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे.
New Tata Nano EV 2023 : गरिबांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार टू व्हीलर च्या किमती आता Mini SUV TATA Nano इलेक्ट्रिक कार 315 KM अवरेज सह.
‘‘पीक विमा कंपन्यांनी परभणी, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अग्रीम भरपाई देण्यास तयारी दर्शविली’’, असे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले. म्हणजेच परभणी, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अग्रीमसाठी पात्र ठरलेल्या मंडळांचा भरपाईचा मार्ग मोकळा झाला. पुढील काही दिवसांमध्ये या मंडळामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीमचा निधी मिळण्यास सुरुवात होईल, असेही कृषी विभागाने सांगितले.
पंतप्रधान खरीपपीक योजनेंतर्गत २१ दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे, तर चार जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिवच या कंपन्यांशी बोलणी करणार आहेत. २८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाल्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली होती. कृषी विभागाने या नुकसानीचे सर्वेक्षण केले होते.
राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा भरपाई द्यावी, असे अद्यादेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले होते. पण विमा कंपन्यांनी सरसकट अग्रीम भरपाईला नकार देत विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. पीक विमा कंपन्यांनी ज्या मंडळांमध्ये २१ दिवसांचा पावसाचा खंड नाही, अशा मंडळांना तसेच काही मंडळांमध्ये काही पिकांसाठी अग्रीम देण्यास नकार दिला होता.Crop Insurance 2023
तसेच अग्रीमचे अद्यादेश काढताना जेवढे नुकसान दाखवले म्हणजेच नुकसानीची टक्केवारी दाखवली त्यावरही कंपन्यांनी आक्षेप घेतेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीची टक्केवारी ७० ते ९० टक्के दाखविण्यात आली असून प्रत्यक्षात एवढे नुकसान नाही, असेही कंपन्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते.
Crop Insurance
‘‘विभागीय आयुक्त पातळीवर सुनावणीचे काम आता जवळपास पूर्ण झाले. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालावर विमा कंपन्या विचार करत आहेत. विमा कंपन्या विभागीय आयुक्तांचे आदेश काही जिल्ह्यांसाठी नाकारले. त्यातच बीड, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. विमा कंपन्यांनी बीड, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्याच्या अग्रीम भरपाईच्या विभागीय आयुक्तांच्या आदेशाला सचिव पातळीवर आव्हान दिले. आजच (ता.२३) या तीन्ही जिल्ह्यांच्या अग्रीम भरपाईबाबत सुनावणी पार पडली,’’ असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा पातळीवर समेटाचा प्रयत्न
विमा कंपन्या आणि जिल्हा पीक विमा समित्या यांच्यामध्ये अग्रीम भरपाईबाबत काही मुद्द्यांवरून मतभेद आहेत. अद्यादेश निघालेल्या मंडळांमधील पिकांना अग्रीम भरपाई द्यावी, असा पवित्रा शासनाचा आहे. तर कंपन्या नियमावर बोट ठेवत आहेत.
त्यामुळे हा मद्दा अपीलाच्या किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेत गेला. त्यामुळे जिल्हापातळीवर काही मुद्द्यांवर तोडगा निघतो का? याचीही चाचपणी सुरु आहे, असेही कृषी विभागाने सांगितले.