Headlines

Cm Kisan Yojana 4 Thousand Rupees:नमो किसान योजनेचे 4 हजार रुपये; “या” तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

Cm Kisan Yojana 4 Thousand Rupees

Cm Kisan Yojana 4 Thousand Rupees : नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळ जवळ 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. जेणेकरून राज्यातील शेतकरी सक्षम आणि स्वावलंबी होतील. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाला नाही. याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे निर्देश दिले.

नमो किसान योजनेचे 4 हजार रुपये

येथे पहा गावानुसार यादी

परंतु,राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ताही मिळालेला नाही. नमो शेतकरी महा सन्मान या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या शेवटच्या चाचण्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे निधी वाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी अलीकडे दिली आहे . जवळ जवळ 86.60 लाख राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजने मध्ये दर 4 महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत . म्हणजेच वर्षाकाठी ही रक्कम जवळपास 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

Cm Kisan Yojana 4 Thousand Rupees

राज्य सरकारची इच्छा ऑगस्टच्या मध्यावधीच्या आत या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होवा अशी होती. परंतु अगोदर आर्थिक तरतूद आणि आता काही टेक्निकल इशूमुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. महाआयटी यावरती वेगाने काम करताना दिसत आहे. या महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना मदत मिळावी हे सरकारचे उद्दीष्ट आहे.

‘नमो-किसान’ या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून जवळ जवळ 6060 कोटी रुपये आपल्या राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत .सरकार कडून सध्या केवळ 4000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे . सॉफ्टवेअरच्या चाचण्या पूर्ण झाल्या नंतर सध्याच्या उपलब्ध असलेल्या चार हजार कोटींच्या निधीतून शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात वितरणास अडचण येणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. तोपर्यंत राज्य सरकार कडून उर्वरित राहिलेले जवळपास 2060 कोटी रुपये मिळू शकतील. आणि त्यातून तिसरा हप्ता शेतकऱ्यांना देता येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *