अतिवृष्टी ग्रस्त:जुलै 2023 च्या अतिवृष्टी ग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी हेक्टरी 14500 मदत जाहीर, पहा कुठले ते 14 जिल्हे आहेत

अतिवृष्टी ग्रस्त

अतिवृष्टी ग्रस्त:अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकाच्या आणि शेतजमीनीच्या नुकसानाकरिता राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.

मान्सूनच्या सुरूवातील अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकाच्या आणि शेतजमीनीच्या नुकसानाकरिता राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. अमरावती विभागातील पाच तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून डीबीटीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

अतिवृष्टी ग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी हेक्टरी 14500 मदत जाहीर

पहा कुठले ते 14 जिल्हे आहेत

यावर्षी जून, जुलै या महिन्यात बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूर आला होता. तर पश्चिम विदर्भासहित मराठवाड्यातीलही काही जिल्ह्यांना अतिवृष्टीने झोडपले होते. यामध्ये शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, उडीद अशा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्याचेही प्रकार झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

दरम्यान, ११ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०७१ कोटी ७७ लाख १ हजार एवढी रक्कम वितरीत केली जाणार असून अमरावती विभागातील ७ लाख ६३ हजार आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील ६ लाख ४६ हजार शेतकरी मिळून जवळपास १४ लाख ९ हजार ३१८ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

‘या’ आहेत अटी

ज्या मंडळामध्ये २४ तासांमध्ये ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेतपिकांचे नुकसान झाले असेल त्या मंडळातील शेतकऱ्यांना ही मदत लागू असणार आहे. ज्या मंडळात फक्त पूर आला असेल त्या मंडळात अतिवृष्टीचा निकष लागू नसून त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. त्याचबरोबर या आधी राज्य शासनाने शेतपिकांच्या नुकसानीसाठी दिलेल्या निधीचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळणार नाही. ही मदत अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुज्ञेय असून संबंधित अधिकाऱ्याने शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे.अतिवृष्टी ग्रस्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *