“या” दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये
पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा
राज्यात राबवले जाणाऱ्या सीएम किसान योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्या 14वा हफ्त्यासोबतच म्हणजेच १५ जुलै रोजी दिला जाणार असणार अशी माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले या हप्त्याची शेतकरी हे वाट बघत होते परंतु आता सर्व शेतकऱ्यांची ही वाट लवकरच पूर्ण होणार आहे.
Land Record 2023 : जमिनीचा नकाशा पहा बांधाच्या लांबी रुंदी सह, फक्त गट नंबर टाकून पहा आपल्या मोबाईलवर
कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत २,००० त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत २,००० रुपये असे मिळून 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे Cm Kisan Yojana Maharashtra.namo Kisan Yojana
नमो शेतकरी योजना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली. पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रात ही योजना सुरु करण्यात आली आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मदत म्हणून दिले जातात. हे पैसे चार महिन्यांच्या फरकाने प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्यात 2 हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात.