Gautami Patil : पाटलांचा बैलगाडा! गौतमी पाटील आणि तरुणाच्या डान्सची जुगलबंदी, व्हिडीओ व्हायरल

Gautami Patil

Gautami Patil : एका कार्यक्रमात गौतमी पाटील डान्स करत असताना समोरून एका तरुणाने तसाच डान्स करून जोरदार टक्कर दिली आहे.

अवघ्या काही दिवसांत महाराष्ट्राला (Maharashtra) वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला की आजही प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. तरुणांना तर गौतमी पाटीलच भलतंच वेड असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता व्हायरल झालेला व्हिडीओ मात्र गौतमी पाटीलच्या डान्सला तोडीस तोड उत्तर देणारा आहे. एका कार्यक्रमात गौतमी पाटील डान्स करत असताना समोरून एका तरुणाने तसाच डान्स करून जोरदार टक्कर दिली आहे.

गौतमी पाटील आणि तरुणाच्या डान्सची जुगलबंदी

व्हिडीओ पाहण्यासाठी

गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा हे जणू समीकरण बनले आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगावच्या कोळपेवाडी (Kolpewadi) येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. आता देखील तिच्या एका कार्यक्रमातील असाच एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील (Gautami Patil) नाचत असताना मंचासमोर एका तरुणाने गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करुन गौतमीला टक्कर दिली. मात्र यामध्ये कोणताही गोंधळ झाला नसून जबदस्त जुगलबंदीचा डान्स झाला आहे.

लावणी क्वीन गौतमी पाटील ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गौतमीचे कार्यक्रम सध्या तिच्या डान्सपेक्षा त्यात होणाऱ्या गोंधळामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान नगर जिल्ह्यातील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठिकठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता सुरुवातीला गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. मात्र तरीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दी आणि गोंधळ झालाच असून पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

तरुणाची गौतमी पाटीलला टक्कर…

गौतमी पाटील चा कार्यक्रम म्हटलं की तरुणांची नेहमीच गर्दी असते. मग गौतमी पाटीलचा डान्स सुरु झाल्यानंतर अनेकजण थिरकायला लागतात. प्रचंड गर्दी असल्याने अनेकदा गोंधळाची स्थितीही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान कार्यक्रमांत  पाटलांचा बैलगाडा सुरु असताना अचानक एक तरुण डान्स करायला लागतो. अगदी गौतमी पाटीलच्या स्टेप्स फॉलो करत जशाच तसा डान्स करत असतो. व्हिडिओत दिसतंय की, स्टेजवर गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नाचत आहे. तिला टक्कर देत हा तरुण स्टेजखाली नाचत आहे. एकीकडे गौतमीचं नृत्य पाहून सर्वजण तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावपळ करतात तर दुसरीकडे तिला पाहून हा तरुण तिच्या सारखा डान्स करत आहे.Gautami Patil

गौतमी पाटील आणि तरुणाच्या डान्सची जुगलबंदी

व्हिडीओ पाहण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *