Msrtc:महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगाने पगार वाढीसाठी मागच्या वर्षी जवळपास दोन महिने आंदोलन केले होते त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे व परिवहन मंत्री म्हणून अनिल परब कार्यरत होते. एसटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली होती.