Land Record:जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात Land Record  आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? जमीन खरेदी करताना कुठले कागदपत्रे आपण तपासून पाहिले पाहिजेत. जमीन खरेदी विक्री Land Record करताना कुठली काळजी घेतली पाहिजे या विषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत. जमिनीच्या व्यवहारांमध्ये Land Record नक्की कशा प्रकारे फसवणूक होते आणि फसवणूक टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते आज आपण पाहूया.

👉बोगस कागदपत्रे, व्यक्ती कसे ओळखावे👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

👉जमीन खरेदी करताना फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करावी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

ईसार एकाचा, विक्री दुसऱ्याला

जमिनी खरेदी Land Record करताना ईसार म्हणुन काही रक्कम आधी देऊन नंतर पूर्ण पैसे द्यायचे आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण करायचा अशी एक पद्धत असते. मात्र अनेकदा एखाद्या व्यक्तीने  दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जास्त पैसे दिले तर मूळ मालक दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार रजिस्टर खरेदी खत द्वारे पूर्ण करू शकतो यामध्ये ईसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते.

वारसाची हरकत

जमिनीचा Land Record मूळ मालक जिवंत नसेल तर सातबार्यावर वारस म्हणून ज्या ज्या मुलाचं नाव तुम्ही पाहता पण वारसांमध्ये मुलीचे नाव जोडणी नसतील किंवा इतर व्यक्तीचे नाव नसलेल्या आणि त्याबद्दल तुम्ही चौकशी केलेली नसेल तरीही जमीन खरेदी करून तुम्हाला काही उपयोग होणार नाही.

एकदा जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीच्या कुळांनी किंवा वारसांनी आपल्या हक्काचा दावा लावला तर ही केस कोर्टामध्ये बरीच वर्षे चालू राहते. त्यामुळे तिथे जमीन खरेदी करणार आहात तिथल्या गावांमध्ये नीट चौकशी करा मगच जमीनीचा व्यवहार पूर्ण करा.

👉बोगस कागदपत्रे, व्यक्ती कसे ओळखावे👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

एकच जमीन दोन, तीन जणांना विकणे

आजकाल अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो कि एकच जमीन पण ती दोन-तीन वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतल्याचा दावा ते लोक करत असतात.

तुम्ही जमीन Land Record खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याचे खरेदीखत रजिस्टर केले जाते. नंतर सातबारावर याची नोंद केली जाते. हा बदल होण्यासाठी दोन तीन महिने सहज जातात. या कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुस-या ग्राहकाला रजिस्टर खरेदीखत वापरून पुन्हा जमीन विकू शकतो.

प्रकरण कोर्टात गेला की रजिस्टर खरेदी खताची पहिली तारीख ज्याची तो त्या जमिनीचा नवा मालक ठरतो. म्हणजे पहिलं खरेदीखत कायदेशीर ठरतं. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन व्यक्तींची फसवणूक होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top