स्वयंरोजगारासाठी मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज

self-employment

स्वयंरोजगारासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज हवंय; जाणून घ्या योजना, पात्रता अन् कुठे साधावा संपर्क!

मुंबई:-  तुम्हाला नोकरी नाहीय. रोजगाराचे साधनही उपलब्ध नाही. काय करावं, असा प्रश्न पडलाय. मग इकडे लक्ष द्या. तुम्ही स्वयंरोजगार का करत नाही. त्यामुळे स्वतःचे स्वतः राजे असाल. त्यासाठी भांडवल नाहीय, कुठून कर्ज घ्यावे याचीही माहिती नाही. त्याची पात्रता, निकष जाणून घ्यायचे आहेत. काळजी करू नका. सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यापैकीच आज एका योजनेची माहिती जाणून घेऊ.

कुणासाठी योजना?

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित self-employment ही योजना आहे. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराकरिता ही योजना राबवली जाते. त्यात बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गटकर्ज व्याज परतावा या योजनांतर्गत कर्ज self-employment सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू व इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिकच्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.जी. तायडे यांनी केले आहे.

हे हि वाचा:-शेत रस्ते/पांदण रस्ते साठी “मातोश्री ग्राम समृद्धी योजना”

काय आहे पात्रता?

बीज self-employment भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व गटकर्ज व्याज परतावा या योजनांचा लाभ घेण्यासाठी self-employment लाभार्थी इतर मागासवर्ग प्रवर्गातील व नाशिक जिल्ह्यातील रहिवासी self-employment असावा. लाभार्थी व्यक्तीचे वय 18 ते 50 या दरम्यान असावे. तसेच तो कोणत्याही बँकचा थकबाकीदार नसावा. बँकेचा सिबिल स्कोर 500 पेक्षा जास्त असावा.

बीज भांडवल योजना

बीज भांडवल योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये, महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाच्या कर्जावर 6 टक्के, बँकेचे साधरण व्याजदर 11 ते 13 टक्के, परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असणार आहे.

या योजनेत 50 लाखांपर्यंत मर्यादा

थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये पर्यंत आहे. या योजनेंतर्गत नियमितपणे दरमहा self-employment ठरविलेला हप्ता भरल्यास व्याजदर शून्य टक्के, परतफेडीचा कालावधी 4 वर्ष असणार आहे. तसेच वैयक्तिक self-employment कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 10 लाख रुपये व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभासाठी प्रकल्प मर्यादा 50 लाख रुपये पर्यंत असणार आहे.

येथे करा नाव नोंदणी

योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महामंडळाच्या खालीली दिलेल्या  संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी केल्यानंतर कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. वरील योजनांबाबत अधिक माहितीसाठी नाशिक महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0253-2236073यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापक एस. जी. तायडे यांनी कळविले आहे.

या योजनेत कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदाराने self-employment जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे ज्ञान किंवा अनुभव असणे आवश्यक आहे. वरील योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळाच्या नियमाप्रमाणे असणार आहे. याची नोंद घ्यावी.
– एस. जी. तायडे, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, नाशिक

कर्ज योजनांचा लाभ self-employment घेण्यासाठी अर्जदाराने महामंडळाच्या   संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी केल्यानंतर कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

नाव नोंदणी करण्यासाठी येथे ⇒ click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *