गेल्या काही दिवसात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई:- गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर हा 115.85 पर लिटर तर डिझेलचा दर हा 106.62 लिटर असा होता.पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले होते. केंद्र सरकारने या भावनेतून दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पेट्रोलचे दर हे उद्यापासून 5 रुपयांनी तर डिझेल चे 10 रुपयांनी कमी होणार आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्क मध्ये कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
हे हि वाचा :-50% अनुदानावर करा शेळीपालन ;पहिल्या टप्प्यात मिळणार पाच जिल्ह्यांना लाभ