अतिवृष्टी मदत; मराठवाड्यासाठी च्या मदतीचे होणार दोन दिवसात वाटप.
मराठवाड्यासाठी 3700 पैकी 2830 कोटी मिळाले.
औरंगाबाद:-मराठवाड्यात 47 लाख 74 हजार 489 शेतकऱ्याचे 36 लाख 52 हजार 872 हेक्टर चे नुकसान झाले होते. त्यानुसार वाढीव दरानुसार 3762 कोटीचा अतिवृष्टी साठी ची मदत राज्य सरकारच्या सूचनेनुसार मंजूर झाली आहे. त्यापैकी राज्य शासनाचे 75 टक्के याप्रमाणे मराठवाड्याला 2860 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसापासून हा निधी वितरीत करण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती आहे.
हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा
13 ऑक्टोबर ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा हजार कोटीचे पॅकेज घोषित केले होते. दिवाळीपूर्वी ह्या मदतीची अनुदान देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शासनाचा निधी कधी येणार याची प्रतीक्षा होती. विरोधी पक्षाच्या वतीने दिवाळी ला पैसे मिळणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
मराठवाड्यातील जिल्हा वाईज निधी खालील प्रमाणे
औरंगाबाद जिल्ह्याला 555 कटी पैकी 415 कोटी रुपये निधी मिळणार आहे. तर जालना जिल्ह्याला 566 पैकी 424 कोटी,परभणी 340 पैकी 254 तर हिंगोली 297 पैकी 222 कोटी, नांदेड 567 पैकी 424 कोटी, बीड 669 पैकी 501 कोटी लातूर 448 पैकी 336 कोटी ,उस्मानाबादला 316 पैकी 237 कोटी रक्कम मिळणार आहे. सदरची रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात डबीटी अंतर्गत ट्रान्सफर केली जाणार आहे.