नारायणगाव:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात आज चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला 950 रुपये उच्चांकी भाव मिळाला. हलक्या प्रतीचे बुगी टोमॅटो क्रेटला देखील तीनशे ते चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा
गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटो पीक पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे.त्यामुळे बाजारात असलेली टमाट्याची कमतरता व भावाला पूरक ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटो पिकावर पडणारे विविध रोग यामुळे टमाट्याची प्लॉट उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये टोमॅटो ला चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये टोमॅटो क्रेटच्या भावात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.पावसामुळे नुकसान झाल्याने आवक घटल्याने व कोरोना नंतर बाजारपेठ पूर्वपदावर येत असल्याने मागणी वाढून टोमॅटो,कांदा व इतर भाजीपाल्याचे भाव वाढले आहे.