मुंबई:-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी दहा हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या निकषांची वाट न पाहता दहा हजार कोटीची अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे हि वाचा :-शून्य रुपये गुंतवून आधार कार्ड फ्रॅंचाईजी घ्या;महिन्याला हजारो कमवा
मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे हातचे पीक निघून गेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
तर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, ‘राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून जिराईत साठी दहा हजार,बागायतीसाठी 15 हजार व बहुवार्षिक पिकासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे.
त्यासंदर्भात आज शासनाने जीआर काडुन मदत देण्याचे जाहीर केले आहे. सदरची मदत दिवाळीपूर्वी देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आलेले असून सदरची मदत लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे.